Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बावखळेश्वर मंदिर, ट्रस्टचं ऑफिस जमीनदोस्त करा

बावखळेश्वर मंदिर, ट्रस्टचं ऑफिस जमीनदोस्त करा
, गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (09:44 IST)

मुंबई उच्च न्यायालयाने बेलापूर येथील बावखळेश्वर मंदिर आणि ट्रस्टचं ऑफिस महिन्याभरात जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले आहे. ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्र‌ियल एरियामधील (टीटीसी) अनेक बेकायदा बांधकामं तोडण्यात आली असली तरी, एमआयडीसीच्या सुमारे अकराशे चौरस मीटर भूखंडावरील बावखळेश्वर मंदिर आणि मंदिर ट्रस्टच्या ऑफिसवरील कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने याविषयी नुकताच आदेश देऊन हे मंदिर आणि ट्रस्ट ऑफिससह इतर सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकार आणि एमआयडीसीने गरज पडल्यास पोलिस बळाची मदत घेऊन चार आठवड्यांच्या आत पाडण्यास सांगितलं आहे. त्यामुळे या मंदिराशी संबंधित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा दणका बसला आहे. तसंच येथील सर्व बेकायदा बांधकामे ही एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताविना शक्य नाही, असं मत व्यक्त करत, एमआयडीसीने जबाबदारी निश्चित करुन संबंधित अधिकाऱ्यांवरही कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देशही खंडपीठाने निकालात दिले आहेत.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१० वी आणि १२ वी परीक्षांचे वेळापत्रक