Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाऊजी- बहिणीचे भांडण मेव्हण्याच्या जीवावर, गमावले प्राण

Mumbai news
Webdunia
मुंबई येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी बहिणीचं व भाऊजीचं भांडण मिटवण मेहुण्याच्या जीवावर बेतलं आहे. जिजाजी दारू प्यायल्यानंतर नशेत बायकोसोबत भांडणाऱ्या तिथे आलेल्या मेव्हण्यालाच मारून टाकल्याची घटना २५ जुलै रोजी दक्षिण मुंबईमध्ये घडली आहे. या घटनेतील आरोपीचे नाव सोबू शेख असून त्या मेव्हण्याचे नाव रहीम आहे. आरोपी सोबूला एमआरए मार्ग पोलिसांनी १२ दिवसांनंतर पश्चिम बंगालमध्ये अटक केली आहे. 
 
एमआरए मार्ग पोलीस ठाण्याजवळील फुटपाथवर मासे विकणारा सोबू शेख हा दारू पिऊन नेहमी बायको नाबिरा हिला मारत होता.  नेहमीप्रमाणेच २५ जुलै रोजी सोबू आणि नाबिरा यांच्यात भांडण सुरू होते. नाबिराचा भाऊ रहीम तेथे आला आणि दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या सोबूला त्याने पाहिले त्याला समजावण्यासाठी त्याच्या जवळ गेला होता. त्यावेळी दारूच्या नशेत असलेला सोबू हा रहीमला शिव्या देऊ लागला. यात त्या दोघांचे जोरदार भांडण झाले. दारूच्या नशेत असलेल्या सोबूने दांडका रहीमच्या डोक्यात जोरदार हाणला. त्यात रहीम गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्यांनी रहीमला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मुत्यू झाला होता. रहीमला मारल्यानंतर सोबू फरार होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर तो हाती सापडला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

Babasaheb and Mata Ramabai's wedding anniversary रमाबाईंचा बाबासाहेबांच्या जीवनावर होता प्रभाव

नांदेडमध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने सहा कामगार बुडाल्याची भीती

LIVE: नांदेडमध्ये शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला

विहीर स्वच्छ करण्यासाठी आठ जण उतरले, विषारी वायूमुळे सर्वांचा मृत्यू

वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया समोर आली

पुढील लेख
Show comments