Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांनो सावधान! येत्या 36 तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता

Webdunia
शनिवार, 4 मे 2024 (21:24 IST)
येत्या 36 तासांत भरतीच्या वेळी समुद्रात 5 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या मोठ्या लाट्या येण्याची शक्यता हवामान खाते आणि मुंबई महापालिकेने वर्तवली आहे. त्यामुळे मासेमारांनी समुद्रात बोटीने जाणे अथवा समुद्र किनारी पर्यटकांनी जाणे टाळावे. यामुळे कोणताही धोका उदभवू शकतो. अशा इशारा भारतीय हवामान विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस यांनी मुंबईकरांना दिला आहे. 
या साठी मुंबई महापालिकेने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून अग्निशमन दल, नौदल, पोलिसांना सज्ज केले आहे. 

शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास समुद्राला भरती आली होती. या वेळी समुद्रात 3.58 मीटरच्या लासा उसळल्या. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. 
रात्री 9 वाजता समुद्रात मोठी भरती असून त्यावेळी समुद्रात 4.08 मिटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन (INCOIS) नुसार, शनिवारी सकाळी 11.30 ते रविवारी रात्री 11.30 पर्यंत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. बीएमसी आयुक्त भूषण गागारिन यांनी नागरिकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी शहरातील समुद्रकिनाऱ्यांवरील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश नागरीकांना दिले आहेत.

सर्व नागरिकांना BMC आणि इतर सर्व प्राधिकरणांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये समुद्रकिना-यावर पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. किनारी भागातील रहिवाशांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Edited By- Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा यावर भाष्य केले

32 वर्षीय व्यक्ती कडून 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार मुंबईतील घटना

देखण्या नवऱ्यासाठी एका महिलेने केली अनोखी जाहिरात, बघताच हसायला लागाल

पाकिस्तान सांप्रदायिक हिंसाचारामुळे आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू

IND vs AUS: प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतणार,ऑस्ट्रेलिया दौरा मध्यंतरी सोडणार

पुढील लेख
Show comments