Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या पोलिसाचा चाळीसगावात खून, चार संशयित ताब्यात

Webdunia
सोमवार, 15 जानेवारी 2024 (09:24 IST)
चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. मयत तरुण मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याचे समजते. चाळीसगाव पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून क्रिकेट स्पर्धेच्या वादातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

चाळीसगाव पीर मुसा कादरी बाबा दर्गा, पाटणादेवी नाक्याजवळ रविवारी सायंकाळी शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, मयत शुभम हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून क्रिकेट स्पर्धेतील वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे कळते.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

नागपुरात प्रेमाला नाकारल्यावरआरोपीचा महिलेला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न

भारतीय हवाई दलाचा 'एअर शो मध्ये आकाशात दिसले रॅफेल आणि सुखोई

लातूरच्या शासकीय वसतिगृहाच्या अन्नातून 50 विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात दाखल

ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी महंत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

मंगळुरूमधील कोल्लूर पुलाजवळ व्यावसायिकाची कार सापडली, पोलिसांचा शोध सुरु

पुढील लेख
Show comments