rashifal-2026

सप्तशृंगगडावर सुरक्षारक्षकाचा खून; अज्ञात विरोधात गुन्हा दाखल

Webdunia
गुरूवार, 14 जुलै 2022 (21:43 IST)
सप्तशृंगगडावर सुरक्षारक्षकाचा खून झाल्याची घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अर्जुन पवार (३०) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. गडावरील गणेश घाटाच्या धबधब्यापुढे रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटरच्या अंतरात गणेश घाटाच्या धबधब्याजवळ हा सुरक्षारक्षक जखमी असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले. त्यांनी सप्तशृंगगडावरील न्यासाच्या कार्यालयास ही माहीती दिली. घटनास्थळावर न्यास प्रशासनाने रुग्णवाहिका पाठविली व वरीष्ठ अधिकारी व पोलिसांना या घटनेची माहीती देण्यात आली. पवार हा सप्तशृंग गडावर देवी संस्थान मध्ये सुरक्षारक्षक या पदावर कार्यरत होता. याप्रकरणी कळवण पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कळवण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

गोवा क्लब आगीच्या घटनेत मोठी कारवाई: लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित

भारतीय बॅडमिंटन खेळाडूंची प्रभावी कामगिरी; हुडा, तन्वी आणि किरण यांचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

ज्युनियर हॉकी विश्वचषकात भारताने इतिहास रचला, अर्जेंटिनाचा ४-२ असा पराभव केला

"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते"; लग्न मोडल्यानंतर मानधनाचे मोठे विधान

महाराष्ट्राला पंप साठवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

पुढील लेख
Show comments