Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सासूने सुनेचे नाही तर सुनेने केली सासूची हत्या मुंबईतील प्रकार

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2019 (10:02 IST)
नेहमीच आपण वृत्तपत्रात वाचतो की सासू सुनेला त्रास देते, कधी कधी सुनेला सासूच्या त्रासाला कंटाळून स्वतःचा जीव देखील देतात. मात्र मुंबई येथील वडाळा परिसरात एका सुनेने तिच्या सासूची किरकोळ कारणावरून हत्या केली आहे. या प्रकरणात सासू साखराबाई गिरे असं या मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी सुरेखा गिरे (३५) या सुनेला अटक केली आहे.
 
वडाळा येथील कोरबा मिठागर परिसरातील तांबे नगरमध्ये साखराबाई या त्यांचा मुलगा आणि सुनेसोबत राहतात. मागच्या काही दिवसांपासून दोघींमध्ये क्षुल्लक कारणांवरून जोरदार  वाद होत होते. अमाझी सून व्यवस्थित सांभाळ करत नसल्यामुळे नावावर असलेली खोली साखराबाई यांनी विकण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरून त्या  दोघींमध्ये पुन्हा मोठा वाद झाला होता. या  वादात राग अनावर झालेल्या सुरेखाने साखराबाईला जोरदार मारहाण केली. गंभीर मारहाणीत साखराबाई गंभीर जखमी झाल्या आणि बेशुद्ध पडल्या. तेव्हा त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वडाळा पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

गुरुदेव श्री श्री रविशंकर महाकुंभात पोहोचले; वसंत पंचमीला संगमात स्नान केले

LIVE: राज्यात आता सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य

आता सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य, फडणवीस सरकारचा निर्णय

महाराष्ट्र सरकार कृषी क्षेत्रात AI चा वापर करण्याच्या विचारात- अजित पवार

प्रज्ञानंधाने गुकेशचा पराभव करून बुद्धिबळाचे मोठे जेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments