Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'माय लास्ट लोकेशन..' असं स्टेस्टस ठेवून उचललं टोकाचं पाऊल

'माय लास्ट लोकेशन..' असं स्टेस्टस ठेवून उचललं टोकाचं पाऊल
, मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (10:06 IST)
'My Last Location is Madgi Bridge'असं व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 
 
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील एका आय. टी. आय प्रशिक्षण शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने परिक्षेत नापास झाल्याच्या नैराश्याने माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. 
 
अनुराग विजय गायधने वय 20 वर्ष रा. शहर वार्ड तुमसर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आय.टी.आय. परिक्षेत नापास झाल्यामुळं तो नैराश्यात होता. विद्यार्थ्याने उल्लेख केलेल्या माडगी पुलावर सायकल आणि जॅकेट आढळले आहे, मात्र 48 तास गेल्यानंतरही विद्यार्थ्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 
 
विद्यार्थ्याच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरुन नदी पात्रातील पाण्यात उडी घेत त्याने आत्महत्या केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज पुन्हा पोलिसांचे शोधकार्य सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसविरोधात बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सीएम चन्नी यांच्या भावाने व्यक्त केला विश्वास, म्हणाले- सरकार बनवणार