Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

24 तासांत 3 खूनांनी नागपूर हादरले

murder
Webdunia
शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (13:50 IST)
Nagpur News: उपराजधानीच्या शहर आणि ग्रामीण भागात सतत सुरू असलेल्या खुनांची मालिका थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. एकाच रात्रीत तीन खूनांनी शहर हादरले. पहिली घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली जिथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी त्यांच्याच मित्राची निर्घृण हत्या केली.
ALSO READ: गडचिरोलीमध्ये नदीत बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, आजीसोबत आंघोळीसाठी गेला होता
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग संकुलात घडली. इथे वर्ध्याच्या कुख्यात आरोपीला त्याच्याच साथीदाराने दगडाने ठेचून ठार मारले. मयत आरोपी होता आणि त्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी सारखे गुन्हे दाखल होते. त्याला एका वर्षासाठी वर्धा पोलिसांनी तुरुंगात पाठवले होते. घटनेच्या दिवशी तो तुरुंगातून बाहेर आला आणि आपल्या साथीदारांना भेटायला गेला तिथे त्याचे मित्रांशी कोणत्या गोष्टीवरून वाद झाले आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी दगडाने डोकं ठेचून त्याची हत्या केली. 
ALSO READ: नाशिकमधील राहुड घाटात भीषण अपघात, 9 ते 10 गाड्या एकमेकांवर आदळल्या, काही जणांचा मृत्यू
दुसरी घटना कपिल नगरमध्ये घडली जिथे दोन लोकांमधील भांडण सोडवणे एका तरुणाला महागात पडले.मयत तरुण एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी आला होता. या मध्ये वधूच्या भावाचे मित्र आरोपीं आपल्या दोन गुंडांसह लग्नात न बोलावता आले आणि ते  वर पक्षाच्या लोकांना शिवीगाळ करू लागले. आणि समारंभाचे वातावरण खराब करू लागले.
ALSO READ: कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ३ प्रवाशांवर हल्ला, तरुणाने चाकूने वार केले
वधूच्या भावांनी त्यांना समजावून शांत करून तिथून बाहेर काढले. तरीही ते वर पक्षाच्या लोकांना शिवीगाळ करत होते. हे पाहून तरुणाने हस्तक्षेप केला या वर आरोपींनी तरुणाची चाकूने वार करून हत्या केली.  तर तिसरी घटना ग्रामीण पारशिवनी भागात घडली. शुल्लक कारणांवरून भावांमध्ये झालेल्या कौटुंबिक वादात धाकट्या भावाने मोठ्या भावावर काठीने मारहाण केली. त्यात मोठ्या भावाचा मृत्यू झाला. 
24 तासांत या तीन घटना घडल्यामुळे नागपूर हादरले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे. 
 
Edited By - Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्री हनुमान चालीसा अर्थ सहित

शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या आधी शनीची राशी बदलेल, ३ राशींचे जीवन बदलेल, धन- समृद्धीचा वर्षाव होईल

जातक कथा : दयाळू मासा

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

'महाराष्ट्रात हिंदी भाषा लादू देणार नाही', उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

LIVE: 'महाराष्ट्रात हिंदी भाषा लादू देणार नाही' म्हणाले उद्धव ठाकरे

रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना इशारा, म्हणाले- आंदोलन योग्य आहे पण दबाव योग्य नाही

भारतात चित्त्यांची संख्या वाढणार, या देशांच्या घनदाट जंगलांमधून "पाहुणे" आणले जातील

दिल्ली : २० वर्षे जुनी ४ मजली इमारत कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments