Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर: सायबर फसवणूकीत 60 लाख रुपये गमावल्याने केली आत्महत्या

Webdunia
रविवार, 8 सप्टेंबर 2024 (15:54 IST)
सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात सायबर फसवणुकीमुळे एका व्यक्तीने 60 लाख रुपये गमावले. या धक्क्यात 51 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 
 
नागपुरात गणेशपेठ परिसरातील एका हॉटेलच्या रूम मध्ये मृतावस्थेत आढळला असून पोलिसांना त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. सदर व्यक्ती 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी हॉटेल मध्ये आला नंतर तो खोलीतून बाहेर पडलाच नाही. मास्टर चावीने दार उघडल्यावर तो बेशुद्द्धावस्थेत आढळून आला.अक्षय बाहेकर असे या व्यक्तीचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी तो गणेशपेठेतील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आला असून त्याने आत्महत्या केली. खोलीतून तो बाहेर पडला नाही आणि दार ठोठवल्यावर त्याने काहीच उत्तर दिले नसल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्याने मास्टर की ने दार उघडल्यावर तो बेशुद्धावस्थेत आढळला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी मयत अक्षयला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांना हॉटेलच्या खोलीत एक सोसाइड नोट सापडली असून त्याने ऑनलाईन फसवणुकीमुळे 60  लाख रुपये गमावल्याने आत्महत्या केल्याचे लिहिले आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ने काही विषारी औषधाचे सेवन केल्याने मृत्यू झाल्याचा संशय आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. पोलीस पथक फसवणुकीचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

स्टार्ट-अप डे निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात लवकरच इनोव्हेशन सिटी बांधली जाईल

LIVE: मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर सोडले टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑटो एक्स्पोचे उद्घाटन करतील

सैफ अली खानवरील हल्ला चिंताजनक, सुप्रिया सुळे म्हणाल्या महाराष्ट्रात आता काय होईल हे वेळच सांगेल

उद्धव ठाकरेंनी वाल्मिक कराड यांचा उल्लेख करून भाजपवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments