Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नांदेड : मोठ्या पगाराची नोकरी सोडून इंजिनिअर दाम्पत्य रमले शेवग्याच्या शेतीत, महिन्याला कमवताय इतके

Webdunia
मंगळवार, 23 मे 2023 (08:27 IST)
भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र, मधल्या काळात निसर्गाचा लहरीपणा आणि कमी उत्पन्न यामुळं लोकांनी रोजगारासाठी वेगळी वाट धरली होती. पण आता शेतीमध्ये होत असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळं तरुण वर्गही शेतीकडे आकर्षित होत आहे. अलिकडच्या काळात काही तरुण शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. तर काही उच्चशिक्षीत तरुण नोकरी न करता शेती करताना दिसत आहेत.
 
नांदेड जिल्ह्यातील उच्च शिक्षित आणि आयटी इंजिनियर असलेल्या एका दाम्पत्याने लाखो रुपयांची नोकरी सोडून शेवग्याच्या पाल्यापासून नवीन आणि वेगळा व्यवसाय सुरु केला आहे. यामधून दाम्पात्य लाखो रुपये कमावतोय. मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे असं या शेतकरी दाम्पत्याच नाव आहे.
 
नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी येथील रहिवासी मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे आयटी क्षेत्रातील इंजिनियर आहेत. पुणे आणि हैदराबाद सारख्या मेट्रो शहरात त्यांनी मागील 15 वर्ष मोठ्या कंपनीत नोकरी केली. मंजुषा पावडे यांना महिन्याला 1 लाख 20 हजार तर त्यांचे पती गुलाब पावडे यांना जवळपास दोन लाख रुपये इतकं पॅकेज मिळत होते. मात्र शेतीच्या माध्यमातून वेगळं काही व्यवसाय सुरु करण्याचं त्यांचं स्वप्न होतं.
 
हैदराबाद येथे वास्तव्यास असताना त्यांनी शेवग्याच्या शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली. शेवग्याच्या शेंगा आणि पाल्याचे काय गुणधर्म आहे. लागवड कशी करावी त्यातून उत्पन्न किती मिळेल याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. 2018 साली हे दाम्पत्य नोकरी सोडून आपल्या गावी परतले.
 
स्वतःच्या दहा एकर शेतीमध्ये कुठलंच पीक न घेता शेतात शेवग्याची लागवड केली. दोन ओळीत नऊ फूट अंतरावर शेवग्याची रोपे लावली. सुरुवातीला शेवग्याच्या शेंगांचा त्यांनी व्यवसाय सुरु केला होता. मात्र म्हणावं तसा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती करण्यास सुरुवात केली.
 
शेवग्याच्या पालापासून पावडर मोरिंग्या पावडर म्हणून ओळखल्या जातं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पावडर अत्यंत गुणकारी आणि रामबाण असल्याच म्हटलं जातं. एक हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होतं असून पावडे दाम्पत्यांना महिन्याकाठी दीड लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून देणारा हा व्यवसाय मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे यशस्वीरित्या सांभाळत आहेत. या पावडरला पुणे ,मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मोठी मागणी असून डॉक्टर आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात पावडर खरेदी करत असल्याची माहिती पावडे दाम्पत्यांनी दिली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments