Publish Date: Tue, 19 Apr 2022 (08:23 IST)
Updated Date: Tue, 19 Apr 2022 (08:29 IST)
नारायण राणे महसूलमंत्री असताना डोंबिवली येथील प्रीमियम कंपनीची ८६ एकर जमीन १२ करोड रुपयांना एका खासगी बिलडरच्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा खोटा जी. आर. काढून अनंत डेव्हलपर्स या बिल्डरला जमीन विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती अधिकार कार्यकर्ते -प्रदिप भालेकर यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाने चौकशीचे आदेश काढले आहेत.