Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक :कपड्यांची पावती ठरली खुनाची साक्षीदार, कंपनी मॅनेजर योगेश मोगरेच्या हत्येचा उलगडा

Webdunia
शनिवार, 1 एप्रिल 2023 (08:33 IST)
नाशिक शहरातील बहुचर्चित योगेश मोगरे खून प्रकरणी नाशिक पोलिसांनी हरियाणाहून संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरुन कपड्याच्या पावतीवरुन कंपनी मॅनेजरच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात काही दिवसांपूर्वी कंपनी मॅनेजरच्या खुनाची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. घरी परतत असताना संशयितांनी योगेश मोगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करत रस्त्यावर सोडून कार घेऊन पळ काढला होता.
 
यानंतर जखमी मोगरे यांना रस्त्याने जाणाऱ्या रिक्षाचालकने तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मोगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
याप्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या खुनाचा तपास करण्यासाठी चार पथके तयार करुन तपास सुरु केला होता. यानुसार मुंबईतील एखाद्या व्यक्तीचे अपहरण करुन खंडणीची मागणी करण्याच्या उद्देशाने हरियाणामधील दोन संशयित मुंबईत आले होते. मात्र अपहरणाचा कट रचण्यासाठी त्यांना कारची आवश्यकता असल्याने त्यांनी नाशिक गाठलं. संशयित पाथर्डी परिसरात असताना अंबड येथील रोहिणी कंपनीचे व्यवस्थापक योगेश सुरेश मोगरे आपल्या कारने घराच्या दिशेने जात होते. यावेळी मोगरे हे एका टपरीवर थांबले होते. त्यानंतर ते गाडीत येऊन बसले.
 
यावेळी संशयितांनी हालचाल पाहून घेत जवळ जात दोघांनी कारची चावी हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोगरे आणि दोघांमध्ये झटापट झाली. मोगरे कार सोडत नसल्याने एका हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. तरीही, ते कार सोडत नसल्याने पुन्हा दुसऱ्या हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले.
 
दरम्यान मोगरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर मोगरे यांची कारसह मुंबईच्या दिशेने पळून गेले होते. मात्र कारमध्ये इंधन कमी असल्याने त्यांनी   कुर्हेनजीक कार सोडून देऊन याच परिसरातील जंगलात दोघांनी रात्र काढली. शुक्रवारी दोघे जण ट्रकने नाशिक शहरात आले, इथून रेल्वेतून ते हरियाणाला गेल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
 
कपड्यांच्या पावतीवरुन खुनाचा उलगडा:
कंपनी मॅनेजर योगेश मोरे यांची हत्या झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी पथके नेमून सर्वच ठिकाणी चौकशी करण्यास सुरुवात केली होती. मात्र कुठूनच काही हाती लागत नव्हते. पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन तपास करण्याचे ठरवून घटनास्थळी चाचपणी केली. त्यावेळी त्यांना 80 मीटरवर संशयास्पद एक पिशवी दिसून आली. त्याची पाहणी केली असता त्यामध्ये नवीन कपडे आणि खरेदीची पावती आढळून आले.
 
पुसट झालेला मोबाईल क्रमांक:
या पावतीवर मोबाईल क्रमांक होता, मात्र यातील एक अंक पुसट,आल्याने दिसण्यास अडचण येत होती. त्यामुळे पोलिसांनी एका क्रमांकासाठी आधुनिक पद्धतीने तपास केला असता तो मोबाईल क्रमांक मुख्य आरोपीचा असल्याचे समोर आले. त्याचे लोकेशन मुंबई, नाशिक आणि हरियाणा दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशनसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी दिसून आले. शिवाय, आरोपीचे लोकेशन हरियाणा मिळून आले. त्यानुसार पोलीस हरियाणामध्ये गेले. पोलिसांनी एका आरोपीला घरातून अटक केली.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

लाडली बहन योजनेचे फॉर्म ऑफलाइन घेता येत नाहीत', महाराष्ट्र सरकार असे का म्हणाले

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ईडीची मोठी कारवाई 23 ठिकाणी धाड़

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: विदर्भात 62 पैकी 36 जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला 3,000 रुपये देणार -काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे

पुढील लेख
Show comments