Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक: गड, किल्ल्यांवर मद्यसेवनाचे गैरवर्तन केल्यास होणार कायदेशीर कारवाई

Webdunia
बुधवार, 12 जुलै 2023 (21:15 IST)
महाराष्ट्रातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. अशा पुरातन वास्तूंच्या ठिकाणी कोणी इसम मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे नाशिकचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी कळविले आहे.
 
उपरोक्त कायद्यान्वये पहिल्या अपराधास 6 महिन्यांपर्यंत सश्रम कारावासाची आणि रूपये 10 हजार पर्यंत दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतरच्या अपराधास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. गड, किल्ले या ठिकाणी व्यक्ती मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागतांना आढळल्यास नागरिकांनी नाशिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या 0253-2581033 या दूरध्वनी क्रमाकांवर तसेच आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर व 8422001133 या व्हॉट्ॲप क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक श्री. गर्जे यांनी केले आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

सर्व पहा

नवीन

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments