धोंडा किंवा अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. या वर्षी तब्बल 19 वर्षांनी धोंडा किंवा अधिक मास आला आहे. या धोंड्याच्या महिन्यात जावयाचं महत्त्व आहे. जावयाला या महिन्यात सासरी बोलवून त्याचे आदरातिथ्य केले जाते. जावयाला आपल्या इच्छा आणि एपत्यानुसार दान दिले जाते. नाशिकच्या एका बांधकाम व्यावसायिकाने अधिकमासाच्या निमित्त आपल्या लेकी आणि जावयाची बैलगाड्यातून काढलेली मिरवणूक चर्चेत आहे.
नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी आपल्या लेकी आणि जावयाची मिरवणूक काढली या साठी त्यांनी सहा बैलगाड्या मागवल्या त्यांची सजावट केली आणि आपल्या लेकी आणि जावयाची त्यांच्यामधून वाजंत्री , टाळ, मृदूंगाच्या गजरात मिरवणूक काढली. या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलगी, तीन आत्या, 13 बहिणी आणि सर्व जावई सहभागी झाले होते
या वेळी मुलीने नववारी नेसली होती. तर जावयाने धोतर, कुर्ता आणि टोपी घातली होती. रस्त्यावर रांगोळी काढली होती. फुलांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकांची सध्या परिसरात चर्चा सुरु आहे.