Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : मदरशात दाखल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या २९ लहान मुलांची सुटका

Webdunia
बुधवार, 31 मे 2023 (20:11 IST)
बिहार येथून सांगली आणि पिंपरी चिंचवड येथे मदरशात दाखल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या २९ लहान मुलांना मनमाड आणि ३० मुलांना भुसावळ येथे रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी ताब्यात घेऊन त्यांची बालसुधार गृहात रवानगी केली आहे. एका प्रवाशाला संशय आल्यानंतर त्याने ट्वीट करून रेल्वे प्रशासनाला माहिती दिल्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलीस सूत्रांनी दिली असून याप्रकरणी मुलांसोबत असलेल्या चार शिक्षकांविरुद्ध कलम ४७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या २९ अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर ३० लहान मुलांना भुसावळ रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आले. दानापूर-पुणे एक्सप्रेस  रेल्वे गाडी नंबर 01040 यामध्ये लहान बालके असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस भुसावळ यांना मिळाली होती.
 
त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी  संयुक्त कारवाई करत भुसावळ येथील एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दाणापूर पुणे ही एक्सप्रेस भुसावळ स्टेशनवर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून ८ ते १५ वयोगटातील ३० मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयिताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
 
त्यानंतर भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा मनमाडपर्यंत प्रवासात रेल्वे गाडीत शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी रेल्वे गाडीत आणखी २९ मुले आणि ४ संशयित मिळून आले. यानंतर सर्वांना ताब्यात घेत मनमाड रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. तसेच भुसावळ येथे मिळून आलेल्या ३० मुलांना जळगाव येथील बालसुधार गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले असून मनमाड येथील २९ मुलांना नाशिकच्या बालसुधार गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

पुढील लेख
Show comments