Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nashik : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारीला विशेष पुरस्कार वितरण सोहळा

Webdunia
सोमवार, 19 डिसेंबर 2022 (08:08 IST)
नाशिक:  माळी समाज सेवा समितीच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगला खिवंसरा यांचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान तसेच  क्रांतिसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार वितरण समारंभ ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालीमार नाशिक येथे होणार आहे. तयारी संदर्भात कार्यकारी मंडळाची बैठक रविवारी दि.(१८) रोजी सकाळी ११ वाजता जुना आडगाव नाका पंचवटी येथे माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
 
 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पुरस्कार वितरण समारंभ होणार  आहे शिवाय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित व्यख्यान,माळी समाजाची दिनदर्शिका प्रकाशन असे विविध कार्यक्रम ०३ जानेवारी २०२३  रोजी होणार असून यावेळी महात्मा फुले यांच्या विचारावर आधारित कार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील   सामाजिक,   राजकीय,  सहकारी, शैक्षणिक,कामगार, औद्योगिक,नाट्य व सिनेक्षेत्रातील कलावंत ,नाटककार ,पत्रकारिता ,वैद्यकीय व बांधकाम क्षेत्रांतील सर्व समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार देऊन माळी समाज सेवा समितीच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी आपण केलेल्या कार्याची माहिती आणि प्रस्ताव  malisamajsevasamiti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ९७६६३५९२३३ याwhatsapp नंबरवर दिनांक २५ डिसेंबर २०२२ च्या आत माळी समाज सेवा समितीचे कार्यालय ४६१०,जुना आडगाव नाका पंचवटी नाशिक या पत्यावर  पाठवावे असे आवाहन माळी समाज सेवा समितीच्या वतीने केले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावर स्वार झालेल्या वराचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

महाकुंभमेळ्यावरून परतताना पिकअप ट्रक आणि कंटेनरची धडक चालकाचा मृत्यू

LIVE: किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर लव्ह जिहाद कायद्यावर हल्लाबोल

संजय राऊत हिरवा झगा घालून फिरतात, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर लव्ह जिहाद कायद्यावर हल्लाबोल

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होणार

पुढील लेख
Show comments