Dharma Sangrah

Nashik : नाशिकमध्ये धरणात बुडून दोघांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 1 मे 2023 (21:47 IST)
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसाद झगरे व वैभव वाकचौरे असे धरणात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून प्रतीक वाकचौरे यास स्थानिकांना वाचविण्यात यश आले आहे. नाशिकहून हे तीन मित्र रविवार  अंजनेरी परीसरात पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अंजनेरी गडासह पाठीमागच्या बाजूस असलेल्या प्रति केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर अंजनेरी गावाजवळ असलेल्या धरणात  हे तिघेजण आंघोळीसाठी गेले. यावेळी तिघेही पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. यानंतर स्थानिकांनी तलावाच्या दिशेने धाव घेत काठावर असलेल्या एकाला धरणातून बाहेर काढले. तर दोघेजण पाण्याच्या लाटेत खूप पुढे वाहून गेल्यामुळे त्यांचा बुडून त्यांचा मृत्यू झाला.
 
या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी नाशिक अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत घेण्यात आली. दरम्यान, यानंतर अंजनेरी गावातील पोहणाऱ्या युवकांनी पाण्यात उड्या घेत शोधमोहीम सुरू केली असता प्रसाद झगरे याचा मृतदेह सापडला. तर दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम रविवारी अंधार झाल्यामुळे थांबविण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु झाली असून याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

सुलतान अझलन शाह कप हॉकी स्पर्धेत खराब हवामानामुळे भारत-बेल्जियम सामना पुढे ढकलला

LIVE: लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही एकनाथ शिंदे

10 हजार वर्षांनंतर इथिओपियन ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचा लोट भारताकडे सरकला, अनेक उड्डाणे रद्द

पंतप्रधान मोदी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करतील

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची चूक पकडली, खराब कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित

पुढील लेख
Show comments