Festival Posters

नाशिकमध्ये भीषण अपघात: मद्यधुंद ट्रक चालकाने कारला धडक दिली, 4 ठार, 2 जखमी

Webdunia
शनिवार, 13 जुलै 2024 (17:40 IST)
शहरातील आडगावजवळ आयशर ट्रक आणि मारुती ब्रेझा यांच्यात धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
आयशर ट्रक आणि मारुती ब्रेझा यांचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात नवीन सिडको परिसरातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर चालकाला समोरून येणाऱ्या ब्रेझा कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
 
ट्रकचा टायर फुटला
शुक्रवार, 13 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर मद्यधुंद चालक नाशिकहून आडगावकडे कोंबडी खत घेऊन जाणारा आयशर ट्रक चालवत होता. दरम्यान, ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक (एमएच 15 जीव्ही 9190) दुभाजकावर चढून थेट नाशिकच्या विरुद्ध दिशेच्या लेनवर गेला आणि त्याला भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारने (एमएच 05 डीएच 9367) धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला.
 
ट्रक चालक व क्लिनर जखमी
आडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये प्रवास करणाऱ्या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक व क्लिनर जखमी झाले आहेत. रेहमान सुलेमान तांबोळी (वय 48), त्यांचा पुतण्या अरबाज चंदूभाई तांबोळी (वय 21), सिज्जू पठाण (वय 38, रा. इंदिरानगर), अक्षय जाधव (वय 24, रा. श्रद्धा विहार, इंदिरानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व लोक सटाणा येथे भाजी विकण्यासाठी गेले होते. तेथील व्यवसाय आटोपून ते नाशिकला घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

National Safety Day2026: राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास, महत्त्व आणि आपली जबाबदारी

६०० हून अधिक भारतीयांना घेऊन दोन विशेष विमाने दिल्लीत दाखल, ऑपरेशन सुरू

वर्धा-चंद्रपूर सीमेवर वाळू माफियां मधील टोळीयुद्धात भारतीय जनता पक्षाचे नेते भरत नागपाल यांची निर्घृण हत्या

पश्चिम आशियातील तणावामुळे टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव दुबईत अडकले

पुढील लेख
Show comments