Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2430 घरांना पुरेल इतकी सौरऊर्जा निर्मिती

Webdunia
विजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौरुर्जेचा वापर हि आता काळाची गरज बनू लागली आहे. केवळ पथदीप किंवा घरातील ऊर्जेपुरताच मर्यादित न राहता सौरऊर्जा आता शेती पाम्पांपासून ते उद्योगांच्या उत्पादनांपर्यंत मोलाची भूमिका बजावू लागली आहे. शेतीमालावर अवलंबून असलेल्या नाशिक येथील सुला विनयार्ड्स कडून सतरा लाख पन्नास हजार युनिट्स सौरउर्जेचीनिर्मिती केली जात आहे. यातून २४३० घरांना वर्षभर मिळेल इतकी वीजनिर्मिती होत आहे. सुलाच्या एकूण वीज वापरा पैकी पन्नास टक्के विजेची बचत या उपक्रमातून साधली जात आहे. इतरही कृषी जोडधंदे किंवा कृषी पूरक उद्योगांनी अशा ऊर्जेची निर्मिती करावी व बचत साधावी याकरता आदर्श ठेवला आहे.
 
वीज निर्मितीकरिता सुलाने १.२७ मेगावॉट क्षमतेचे सोलर पॅनल्स उभारलेले असून त्यातून सतरा लाख पन्नास हजार युनिट्स ऊर्जा तयार होते. एका गावातील एका घराचा वीज वापर दर महिन्याला सरासरी साठ युनिट्स इतका असतो. म्हणजेच एका घराला सरासरी सातशे वीस युनिट्स इतकी ऊर्जा लागते. या गणितानुसार, एका गावातील 2430 घरांना वर्षभर मिळेल इतकी वीज येथे तयार होत आहे. हि वीज संपूर्ण उद्योगाला लागणाऱ्या विजेचा पन्नास टक्के वाटा उचलते. याचा विचार करता, सतरा लाख पन्नास हजार युनिट्स सौरऊर्जा हि ११७८ मेट्रिक टन कार्बनडायऑक्साईड वातावरणात जाण्यापासून वाचवते. यामुळे प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होत आहे.

येथे होणार्‍या सौरऊर्जेच्या वापराचे आणखी काही फायदे:
 
* छपरांवर सोलर पॅनल्स बसवण्याचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे, या पॅनल्स मुळे वास्तूची छपरे तापत नाहीत. कारण सूर्याची सर्व उष्णता हि पॅनल्समध्ये शोषली जाते आणि छपरे थंड राहतात. त्यामुळे बिल्डिंग्स थंड राहतात, आणि पंखे किंवा एसी करता वापरावी लागणार्‍या ऊर्जेचे प्रमाण कमी होते.
 
* पाणी तापवण्याकरता सौर ऊर्जेचा वापर: वायनरी, रिसॉर्ट आणि इतर उपक्रमांना लागणारे गरम पाणी – क्षमता- २१००० लीटर. या उपक्रमामुळे बॉयलरला लागणारे २३००० लीटर डिझेल वाचते. म्हणजे पुन्हा वातावरणात सोडल्या जाणाऱ्या ३३ मॅट्रिकटन कार्बनडायआँक्साईडचे उत्सर्जन टाळले जाते.
 
* स्काय लाइट्स – सुलाने आपल्या वायनरी आणि कार्यालयांमध्ये १५१ स्काय लाइट्स बसवले आहेत, ज्यामुळे विजेची ३८६१२ युनिट्स वाचतात. हा आकडा देखील प्रकाशासाठी लागणाऱ्या एकूण ऊर्जेच्या 50 टक्के आहे.

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

पुढील लेख
Show comments