rashifal-2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला - युवती कार्यकर्त्यांची मंत्रालयात धडक

Webdunia
शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला व युवती कार्यकर्त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर कांदे फेकत घोषणाबाजी केली. पुणे जिल्ह्यातील राहू (ता.दौंड) येथील शेतकरी दत्तात्रेय शिंदे यांच्या शेतातील कांदे कार्यकर्त्यांनी दालनात फेकले.
 
कांद्याला मिळणारा कवडीमोल हमीभाव तसेच बाजारभावापेक्षा वाहतुकीचा होणारा अधिकच खर्च यामुळे पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून आपल्या शेतातील कांद्याचे उभे पिक ट्रॅक्टरने जमिनीत गाडून टाकल्याची घटना नुकतीच घडली. दि.२७ एप्रिल २०१७ रोजी खासदार सुप्रियाताई सुळे या त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर असताना दौंड परिसरातील शेतकरी कांद्याचे उभे पीक जमिनीत गाडत असल्याची माहिती त्यांना समजली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेत शेतकऱ्यांची भेट घेतली होती. याधीही नाशिकमधल्या नगरसूल येथेही एका शेतकऱ्याने पाच एकरवरील कांदा जाळून टाकला होता. त्यावेळीही खासदार सुप्रिया सुळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र लिहून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दाहक स्थिती शासनासमोर मांडली होती.
 
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, युतीची अजित पवारांची मोठी घोषणा

IND W vs SL W : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथा T20 30 धावांनी जिंकला

ठाण्यातील एका महिलेने सहा जणांना जीवनदान दिले

मंत्री सरनाईक यांनी भाजप आमदार मेहता यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला

बारामतीत शरद पवार यांच्या हस्ते शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे उदघाटन, अदानी यांचे कौतुक केले

पुढील लेख
Show comments