Dharma Sangrah

राष्ट्रवादीकडून शक्तिप्रदर्शन, निवडणूक तयारीला सुरुवात

Webdunia
शनिवार, 9 जून 2018 (09:13 IST)
राष्ट्रवादीच्या वतीने २०व्या वर्धापनदिनीचे औचित्य साधून रविवारी पुण्यात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याच वेळी काँग्रेस नेत्यांच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. यातून आगामी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली जाणार आहे. 
 
राष्ट्रवादीचा रविवारी वर्धापन दिन असून, पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन केले होते. त्याची सांगता आणि पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीने सध्या पश्चिम महाराष्ट्र या एकेकाळच्या बालेकिल्ल्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या महिन्यात हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती केली होती. पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा जिंकण्याचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. त्यातूनच या भागावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी होणाऱ्या मेळाव्याला ५० हजारांपेक्षा जास्त उपस्थिती असेल, असे  सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

अजित पवार आणि सुप्रिया सुळे अडीच वर्षांनी एकाच मंचावर, संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला

आठवले गटाला एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त, भाजपा विरोधात प्रचार करणार

LIVE: अजित पवार आणि सुप्रिया सुळे अडीच वर्षांनी एकाच मंचावर

IND vs NZ : पहिला एकदिवसीय सामना दुपारी या वेळी सुरू होईल

लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी: देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments