Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीचा हा आमदार अखेर तुरुंगात दाखल

NCP MLA Sanjay Kadam
यावेळी छगन भुजबळ नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दुसरा आमदार तुरुंगात गेला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम  यांना 2005 मधील तोडफोड प्रकरण आता भोवत आहे.

न्यायालयाच्या  आदेशानुसार त्यांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आता  त्यांची रवानगी रत्नागिरीच्या जिल्हा कारागृहात होणार आहे.  शिवसेनेत असताना कदम यांनी 2005 साली  खेड येथे आलेल्या अतिवृष्टीत बाधित झालेल्या बाजारपेठेतील लोकांची भेट घेतली, त्यावेळी खेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या ठिकाणी तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम कार्यरत होते.

प्रवीण गेडाम आणि संजय कदम यांच्यात तेव्हा वाद झाला होता.  वादानंतर कदम यांनी कार्यालयाची तोडफोड केली. त्याप्रकरणी प्रवीण गेडाम यांनी खेड पोलिसात गुन्हा देखील दाखल केला होता. याप्रकरणी 2015 मध्ये खेड दिवाणी न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा कदम यांना सुनावली होती, खेड दिवाणी न्यायालयाचा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे याप्रकरणी खेड पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार कदम यांना ताब्यात घेतल आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बजाज ची सर्वात स्वस्त व मस्त बाईक