राष्ट्रवादीचे सभापती रितेश वासनिक सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण असे की ,सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते नृत्यांगना गौतमी पाटीलांच्या गाण्यावर थिरकत आहे. लावणी डान्सर गौतमी पाटील यांनी आपल्या डान्सने महाराष्ट्राच्या तरुणाईला भुरळ घातली आहे.
तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. तिच्या चाहत्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्या गाण्यावर प्रत्येकाला थिरकण्याचा मोह आवरत नाही तर तिच्या गाण्यावर डान्स करण्याचा मोह चक्क सभापतींना देखील आवरता आला नाही.
रितेश वासनिक यांनी मोहाडी तालुक्यातील बीड येथे सुरु असलेल्या मंडईच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम देखील होता. रितेश यांनी लावणीच्या गाण्यावर ठेका धरला आणि पैसे उधळले. आमदारांना ठेका धरलेला पाहून कार्यकर्त्यांनी देखील बेभान होऊन नाचायला सुरुवात केली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.