मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन...

मंगळवार, 25 जून 2019 (16:45 IST)
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. महापालिकेने मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली असल्याने त्यांना डिफॉल्टर ठरवल्यानंतर ही थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहीत हे आंदोलन केले.
 
कार्यकर्त्यांनी सीएसएमटी येथे बसून मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टी भरण्यासाठी भीक मागत असल्याचे लोकांना सांगितले असता अनेकांनी उत्स्फूर्तपणे पैसे देऊ केले. जमा झालेली ही रक्कम मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या राष्ट्रगीतावेळी काय वाजतं?