Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निफाडमध्ये ७३ लाखांची चलनातून बाद झालेली रोकड जप्त

Webdunia
गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (17:03 IST)
निफाड पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दोन कारमध्ये ७३ लाख रुपयांची चलनातून बाद झालेली रोकड जप्त केली आहे. या प्रकरणात नाकाबंदी सुरू असतांना निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर प्रत्येक वाहनांची तपासणी सुरु होती. यावेळी नाशिकहून कोपरगावकडे जाणार्‍या (एम.एच. १७ ए. झेड ३५७१)   करोला अल्टीस या कारच्या झडतीत ३२ लाख ९९  हजार ५०० रुपये तर गुजरातकडून वैजापूरकडे जाणार्‍या एर्टिगा (एम.एच. २० सी.एस. ९७१९) कारमध्ये ४० लाख रुपये झडतीत मिळून आले. दोन्ही कारमध्ये ७२  लाख ९९  हजार ५००  रुपये आढळले. या सर्व नोटा सध्या चलनातून रद्द केलेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या या नोटा मोजण्यासाठी येथीलच बँक ऑफ हैदराबाद शाखेच्या व्यवस्थापकास मशीनसह बोलवण्यात आले. त्यांनी सदर रकमेची मोजणी केल्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला असून याबाबत निफाड पोलिसांनी आयकर विभागाला कळवले. 
 
सदरची कारवाई निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.व्ही. गिरी, ए. एस. गांगुर्डे, एस. सी. वाघ, के. डी. निंबेकर, त्र्यंबक पारधे, विलास बिडगर, महाजन, मनोज आहेर आदी सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पुढील लेख
Show comments