Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युकेवरून येणाऱ्या प्रवाशांची अशी घेतली जाणारी काळजी, एकही जण घरी सोडला जाणार नाही

Webdunia
मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (08:39 IST)
राज्यात युकेवरून एकही फ्लाईट लँड होणार नाही. जे आता तेथून टेक ऑफ झालेत, त्यामधील प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल, एकही जण घरी सोडला जाणार नाही. एकूण पाच फ्लाईट येणार असून १ हजार जण असतील. लक्षणे असतील तर सेव्हन हिल्समध्ये ठेवले जाईल. लक्षणे नसलेल्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाईल. अशी माहिती  मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे.
 
'इतर युरोपीयन देशांतून येणा-या फ्लाईटमधील लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. लक्षणे असलेल्यांना जीटी रूग्णालयात दाखल केले जाईल. इतरांना हॉटेलमध्ये ठेवले जाईल. एकालाही मुंबई सोडता येणार नाही.' असं माहिती देखील चहल यांनी दिली आहे.
 
'बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना हाताळणा-यांना मोफत पीपीई कीट दिले जाणार आहे. इतर देशांतून येणा-यांना आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. लक्षणे नसलेल्यांना हातावर शिक्का मारून होम क्वारंटाईन केले जाईल. २ हजार जणांची हॉटेलमध्ये क्वारंटाईन करता व्यवस्था केली गेली.' असल्याची माहिती चहल यांनी दिली.
 
'२३ डिसेंबरपासून रात्री ११ ते ६ नाईट कर्फ्यू मुंबईत असेल. मागील विकेंडचा अनुभव पाहता हा निर्णय घेतला गेला आहे. हा काही लॉकडाऊन नाही. रात्री ५ पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही. दूध,भाजीपाला वाहतूकीवर परिणाम होणार नाही. रात्री ११ पर्यंत सर्व काम आताप्रमाणे सुरू राहिल. नविन विषाणूबाबत अद्याप डॉक्टरांनी अधिक माहिती नाही, त्यामुळं विलगीकरण महत्वाचे असल्याचं,' आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

पुढील लेख
Show comments