Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही

शरद पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही
, बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (17:30 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याचं वृत्त आलं होत. पण, आता निवडणूक आयोगाकडूनच अत्यंच महत्त्वाची माहिती देत पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 
 
निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुनच आयकर विभागानं शरद पवार यांच्या नावे नोटीस पाठवली होती असं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं यात म्हटलं गेल्याची माहिती समोर आली. पण, निवडणूक आयोगानं असा कोणताही इशारा दिला नसल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
२००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचं म्हटलं गेलं होतं. नोटीस आल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रियाही दिली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसे विचारते 'केम छो वरळी...'