Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सायंकाळपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज, यलो अलर्ट नाही

Webdunia
सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (07:40 IST)
भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड ऑरेंज, येलो अलर्ट, देण्यात आलेला नाही अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज (दि.  ६ ऑगस्ट ) संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.
 
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि मी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
 
राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे-:
 
हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ४५७ क्युमेक्स विसर्ग
 
गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ३१२८.३५ क्युमेक्स विसर्ग
 
भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत ५४.०८ क्युमेक्स विसर्ग
 
दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४  दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग
 
दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता ६७९.११ दलघमी) आत्तापर्यंत ३६ क्युमेक्स विसर्ग
 
राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग
 
ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत १४१ क्युमेक्स विसर्ग
 
बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग
 
निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत १७.४३ क्युमेक्स विसर्ग
 
वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत ४५ क्युमेक्स विसर्ग
 
सूर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आत्तापर्यंत १८.४० क्युमेक्स विसर्ग
 
चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ३१ क्युमेक्स विसर्ग
 
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
 
पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी पहाटे ३:५३ वाजता व दुपारी ३: ५६ वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या असून सकाळी ३.९ मीटर आणि दुपारी ४.५ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.
 
वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क  राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व  इन्स्टॉल करावे.  हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते.
 
नागरिकांनी आपत्तीं चा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.
 
राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
 
आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:
 
फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL
 
ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra
 
अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:
 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)
 
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mumbai Digital Arrest मुंबईतील सर्वात मोठी डिजिटल अटक, 1 महिना व्हॉट्सॲप कॉलवर ठेवले, 6 खात्यांमधून 3.8 कोटी लुटले

धक्कादायक : मुंबईत 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला

LIVE: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

जानेवारीत मिळू शकते मोठी भेट, 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार

पुढील लेख
Show comments