Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये सोमवारपासून ‘नो व्हॅक्सीन नो एंट्री’

Webdunia
शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (08:44 IST)
कोरोना प्रादुर्भाव रोखण्पायासाठी शासकीय यंत्रणा लसीकरणाचा वेग वाढवत आहेत. नाशिकमध्येही लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागली आहे. आता शहरातील महत्वाच्या ठिकाणी दोन डोस घेतले असल्यासच प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. यात नाशिकमध्ये  सोमवारपासून ‘नो व्हॅक्सीन नो एंट्री’ असणार आहे. जिल्हा आणि शहरभरात गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने लसीकरणाचा वेग प्रचंड वाढवला आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद फारसा मिळत नसल्याने आता ही  मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे लस न घेणाऱ्यांना शहरातील महत्वाच्या ठिकाणी मज्जाव करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी गुरुवारी नुकतीच जिल्हा प्रशासनाने आढावा बैठक घेतली. त्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणासह नव्याने कराव्या लागणाऱ्या लसीकरणाबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच ज्या नागरिकांनी अद्याप पहिला डोसही घेतलेला नाही, त्यांच्या लसीकरणावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लसीकरण टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाचे नो व्हॅक्सिन, नो एंट्री चा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व शासकीय आणि खासगी ठिकाणी ही सक्ती केली जाणार आहे.
 
दरम्यान नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घेण्याची गरज असून, दुसरा डोस राहिलेल्यानी देखील नजीकच्या रुग्णालयात संपर्क साधून लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनमार्फत करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments