Dharma Sangrah

2 महिन्यांपूर्वीच बंद झाली होती नोट छपाई

Webdunia
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी मंगळवारी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. मात्र नाशिकमध्ये असलेल्या करन्सी नोट प्रेसमध्ये दोन महिन्यांपूर्वीच या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबतचा खुलासा नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी केला आहे. सोबतच नव्या नोटांची छपाई सुरु झाली आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवी डिझाइन असलेली पाचशेची नोट नाशिक आणि देवास येथील नोट प्रेसमध्ये आणि दोन हजार रुपयांची नोट म्हैसूर आणि सालगोनियाच्या नोट प्रेसमध्ये छपाईचे काम सुरू आहे.
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाबाबत देशात अतिशय गुप्तता बाळगण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच या नोटांच्या छपाई बंद करण्याचे आदेश सरकारने दिल्याचे आता समोर आले आहे. नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये आठ दिवस आधी नव्या नोटांची छपाई सुरु झाली आहे. नाशिकमध्ये ५०  कोटी नोटांची छपाई होत आहे. तर देशातील इतर प्रेसमध्येही छपाई सुरु असल्याची जगदीश गोडसे यांनी सांगितले आहे. सोबतच या निर्णयामुळे कामावर फारसा फरक पडलेला नाही. मात्र, नोटांची मागणी वाढली आणि काम वाढले तरी कामगार रात्रंदिवस अतिरिक्त कामासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

तेहरानमध्ये भीषण बॉम्बहल्ला; १३ जणांचा मृत्यू

LIVE: मुंबईच्या मालाड पूर्वमध्ये दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष

लपाछपी खेळणे चिमुकलीच्या जीवावर बेतले; बेड बॉक्समध्ये अडकल्याने दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

International Sports Day आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस

दिल्ली-मुंबईत खेळण्यातील बॉम्बने दहशत निर्माण करण्याचा कट उघडकीस, २ संशयित दहशतवाद्यांना अटक

पुढील लेख
Show comments