Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवजयंती निमित्त शोभायात्रा, आमदारांसह 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

शिवजयंती निमित्त शोभायात्रा, आमदारांसह 400 जणांविरोधात गुन्हा दाखल
, शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (13:29 IST)
अकोला- शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं सरकारचं आवाहन धाब्यावर बसवत अकोला जिल्ह्यातील अकोट याठिकाणी शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. 
 
याप्रकरणी दहीहंडा पोलिसांनी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 400 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
अकोल्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर कुटासा गावामध्ये शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली त्यामुळे घडलेल्या प्रकारावर कारवाई करण्यात आली. 
 
कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी करावी, अशी सूचना राज्य सरकारद्वारे देण्यात आली होती. त्यासाठी ठाकरे सरकारतर्फे नियामावली देखील जाहीर करण्यात आल्या असताना हा प्रकार घडला. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाईक रॅली, प्रभात फेरी, पोवाडे वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायला बंदी घालण्यात आली होती.
 
जास्तीत जास्त 10 लोकांच्या उपस्थितीत मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच शिवजयंती साजरी करायला परवानगी होती. केवळ शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मसोहळ्यासाठी 100 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिमान: भारताकडून 49 देशांना कोरोना लस पुरविण्याची योजना