Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर २ गंभीर जखमी

accident
, शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (19:37 IST)
अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच जुन्नर तालुक्यातील वडज धरणाच्या कँनलमध्ये अपघाताची एक मोठी घटना घडली आहे. उसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने एका ऊस कामगाराचा मृत्यू झालाय. या अपघातात दोन जण गंभीर जखमी आहेत.  
 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विघ्नहर साखर कारखान्याकडे ऊस भरुन ट्रॅक्टर जात असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याची तक्रार जुन्नर पोलीसांत करण्यात आलीये. अपघातात एका कामगाराच्या मृत्यूसह दोघांना झालेल्या गंभीर दुखापतीस जबाबदार ठेवत ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
सतिष चव्हाण असे अपघातात मृत्यू झालेल्या ऊस कामगाराचे नाव आहे. यामध्ये योगेश पवार,गोपाळ राठोड गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा चक्काचूर झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिकी यात्रेसाठी दर्शनरांग उभारणीचे काम अंतिम टप्प्यात, पहिल्यांदाच 10 विश्रांती कक्ष उभारणार