Marathi Biodata Maker

गोंदियाच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

Webdunia
रविवार, 15 सप्टेंबर 2024 (13:04 IST)
गोंदिया जिल्ह्यात बकऱ्यांची झाड्याच्या फांद्या आणायला पालेवाडा जंगल परिसरात  गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केला त्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वन विभागला ही माहिती गावातील काही लोकांनी दिली. 
 
सदर घटना शुक्रवारी गोंदियाच्या जामडी वनक्षेत्रातील एफडीसीएम राखीव जंगलाच्या कंपार्टमेंट क्रमांक 420 मध्ये घडली आहे. या जंगलात गुऱ्यांसाठी चारायला झाड्याच्या फांद्या आणायला गेलेला एका 44 वर्षीय व्यक्तीवर वाघाने हल्ला केला. बसंत राव ढोर असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. बसंत हे कलपथरी ता. गोरेगाव चे रहिवासी होते. 

13 सप्टेंबर रोजी बसंत हे मुंडीपार ते मुरदोली दरम्यान पालेवाडा जंगल परिसरात गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला ते जागीच ठार झाले. संध्याकाळ पर्यंत ते घरी परतले नाही. त्यांचे कुंटुंबीयानी त्यांचा शोध घेण्यात सुरु केले नंतर त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली.

पोलिसांनी 14 सप्टेंबर रोजी त्यांना शोधत असताना त्यांचा मृतदेह पालेवाडा जंगल परिसरात आढळला. त्यांच्या मानेवर वाघाच्या दाताच्या खुणा आढळल्या.

या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून आजूबाजूच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वनविभाग पथकाने मोहीम राबवून वाघाला पकडण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

अण्णा हजारे यांचा कॉकरोच जनता पक्षाला पाठिंबा दिल्यावरून गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले

आमदार बच्चू कडू यांनी नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिली

अण्णा हजारे यांचा 'कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा, सरकारला इशारा दिला

LIVE: राज्यात पुढील ४८ तासांसाठी यलो अलर्ट जारी

Shooting: मनू भाकर म्युनिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत तीन प्रकारांमध्ये सहभागी होणार

पुढील लेख
Show comments