Dharma Sangrah

कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (19:59 IST)
Onion farmer commits suicide नाशिकच्या देवळा  तालुक्यातील सातवाईवाडी येथे हताश झालेल्या कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने घराजवळच्या विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रताप बापू जाधव (३६) असे आत्महत्या करणा-या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे.
 
प्रतापने यावर्षी कांदा लागवड करून त्याच्यासाठी मोठा खर्च केला होता. मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळाला. त्यातच साठवलेला कांदा खराब झाला. त्यामुळे घेतले कर्ज कसे फेडायचे आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा या विवंचनेत तो होता. त्यातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सततची नापिकी आणि या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळेही तो चिंतेत होता.
 
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. घरातील लोकांना पहाटे तो न दिसल्यामुळे त्यांनी शोध घेतला असता त्यांचे स्वेटर विहिरी जवळ दिसल्याने ही घटना समोर आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबईत उभारले जाणार जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम! १ लाख प्रेक्षकांची क्षमता

रातोरात १२,००० जणांचा रोजगार हिरावला! ओरेकलच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये भीती; काय आहे AI चं कनेक्शन?

LIVE: महाराष्ट्र राजकारण: संजय राऊतांचे भाकीत, शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे ५० आमदार भाजपशी हातमिळवणी करणार का?

एक माहिती, एक लाख रुपये! कन्याभ्रूणहत्या रोखण्यासाठी वाशिम प्रशासनाचा मोठा निर्णय

अंजनगावात तणाव: शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; शहरात कडेकोट बंदोबस्त।

पुढील लेख
Show comments