Marathi Biodata Maker

12 वी च्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्टोबरपासून

Webdunia
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (21:11 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. राज्य मंडळाकडून याबाबतच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
मंडळाच्या सचिव अनुराधा ओक  यांनी यासंदर्भात माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यापुर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा 1ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे.
 
आता मंडळाकडून इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरायाचे आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालय प्रमुखामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
 
मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच अर्ज भरावेत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच वेबसाइटवरुन परीक्षेचे अर्जही भरता येणार आहेत.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

"हा देशद्रोह आहे...," राहुल गांधींनी बीएमसी निवडणुकीबद्दल असे का म्हटले?

LIVE: Maharashtra Election Results भाजप युती 66 जागांवर आघाडीवर

बॉम्बची धमकी' मिळाल्यानंतर तुर्की एअरलाइन्सच्या विमानाचे बार्सिलोनामध्ये आपत्कालीन लँडिंग

"राजकारण सोडा आणि दुसरं काही करा..." बीएमसीचा ट्रेंड पाहून उद्धव ठाकरे गटातील एक नेता स्वतःच्या युतीवर संतापले

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये RAC तिकिटे उपलब्ध नसतील; प्रवाशांना कन्फर्म सीटशिवाय जनरल ट्रेनमध्येही प्रवास करता येणार नाही

पुढील लेख
Show comments