Festival Posters

बीड मध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगींना उघडपणे जीवे मारण्याची धमकी

Webdunia
शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 (15:14 IST)
सध्या देशभरात मुस्लिम संघटनांकडून आय लव्ह मुहम्मद मोहीम आयोजित केली जात आहे. बीड येथे "आय लव्ह मुहम्मद" कार्यक्रमादरम्यान, एका मौलवीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दफन करण्याची धमकी दिली.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 
<

A man in Maharashtra's Beed was filmed openly threatening Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and using offensive language against him, amid the 'I love Muhammad' row. https://t.co/dtOI3S5r5G pic.twitter.com/WopkAzhZyK

— Vani Mehrotra (@vani_mehrotra) September 26, 2025 >
आय लव्ह मोहम्मद हा कार्यक्रम बीडमध्ये सुरु असताना एका मौलवीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह आणि भडकाऊ भाषणे केली. मौलवीने थेट मंचावरूनच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उघडपणे धमकी दिली. योगी जर माजलगावला आले तर त्यांना तिथेच दफन करू. तसेच मौलवीने योगी यांच्यासाठी अपशब्द वापरले. 
ALSO READ: ठाणे : न्यायालयाच्या आवारात पोलिसावर चार कैद्यांनी हल्ला केला
सदर घटना बीडच्या माजलगाव येथील आहे. जिथे मुस्लिम संघटनांने आय लव्ह मुहम्मद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
ALSO READ: ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकनाथ खडसें यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर
माजलगावमधील या कार्यक्रमादरम्यान मौलाना अशफाक निसार शेख यांनी मुख्यमंत्री योगी यांना थेट मंचावरूनच दफन करण्याची धमकी दिली. 
 
मौलाना म्हणाले, "जर योगी येथे आले तर त्यांना येथेच दफन केले जाईल." या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. मौलानांचे म्हणणे ऐकताचतेथे उपस्थित असलेले लोक संतप्त झाले आणि तणाव वाढला. तथापि, माजलगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी अद्याप कोणताही एफआयआर दाखल केलेला  नाही.
ALSO READ: महाराष्ट्रात बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे 3000 कोटी रुपयांची फसवणूक, आरोपीला अटक
मुख्यमंत्री योगी यांच्याविरुद्धच्या धमकीनंतर, या प्रकरणात पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सोशल मीडियावर व्हिडिओ वेगाने पसरत असतानाही,बीड पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. 
 
या घटनेमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील या धमकीमुळे केवळ राज्यातच नाही तर देशभरात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
Edited By - Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

LIVE: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात ३००० रुपये येणार

ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बेपत्ता

पुढील लेख
Show comments