Festival Posters

हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन मागे घेण्याचे आदेश

Webdunia
शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (16:17 IST)
रायगड जिल्ह्यातील हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून पुरवण्यात आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन मागे घेण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. संबंधीत कंपनीच्या विनंतीवरुनच हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 28 आणि 29 एप्रिल रोजी विविध ठिकाणच्या 90 जणांना या इंजेक्शनमुळे त्रास झाल्याच्या तक्रारी आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
28 एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडूनसुमारे 510 रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यात आले होते. पैकी 310 इंजेक्शन जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांना देण्यात आले होते. 29 एप्रिल रोजी तेथील रुग्णांना सदरचे इंजेक्शन टोचण्यात आल्याने सुमारे 90 रुग्णांना काही प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर काही तांत्रिक कारणाने कंपनीने कोविकोफर नावाच्या बॅच नंबर एचसीएल 21013 इंजेक्शनचा वापर थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पेण येथील रायगडच्या सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

सार्वजनिक विद्यापीठांनी गुणवत्ता सुधारावी-मख्यमंत्री फडणवीस

Blackbuck deaths in Karnataka ३१ काळवीटांच्या मृत्यूने कर्नाटकात घबराट पसरली

LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का, नाशिक निवडणुकीतून पक्षाची माघार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी व हल्ले नियंत्रित करण्यासाठी ड्रोन पाळत ठेवली जाणार

मालेगावमध्ये एका ३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या; चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला

पुढील लेख
Show comments