rashifal-2026

आमचा उद्देश एकच आहे, फक्त जबाबदाऱ्या बदलल्या आहे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Webdunia
गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (20:51 IST)
Chief Minister Devendra Fadnavis news: आज मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले आहे आणि येथूनही आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू आणि आम्ही आता थांबणार नाही, दिशा आणि गती तीच आहे फक्त आमच्या भूमिका बदलल्या आहे. आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी निर्णय घेऊ. आम्हाला आमच्या जाहीरनाम्यात नमूद केलेली सर्व कामे पूर्ण करायची आहे असे देखील ते म्हणाले 
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकार स्थापन करण्यात विलंब झाला आहे यावर माझा विश्वास नाही. युतीचे सरकार असताना अनेक निर्णय घ्यावे लागतात, हे आपण समजून घेतले पाहिजे. आघाडी सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर सल्लामसलत करावी लागते आणि ती सल्लामसलत आम्ही केली आहे. 
 
तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कोणते मंत्रिपद कोणाकडे राहणार हे अंतिम टप्प्यात असून ते आम्ही तिघे मिळून ठरवू. जुन्या मंत्र्यांच्या कामाचेही मूल्यमापन करू आणि त्याआधारेच पुढील निर्णय घेतला जाईल.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली, एसईसी वादावर मोठा निर्णय

Winter Session २६ लाख बोगस लाभार्थी? लाडकी बहीण योजनेवरून गोंधळ

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुढील लेख
Show comments