Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीं मतमोजणी सुरू असे आहेत निकाल

Webdunia
बुधवार, 19 जानेवारी 2022 (15:14 IST)
राज्यात ओबीसी आरक्षणा विना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या २३ व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठी निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झालं. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी मंगळवारी सरासरी 81 टक्के तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, निवडणुकीतील या निकालाने कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
 
सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक आणि शिरोळ, नागभीड , जत , सिल्लोड , फुलंब्री , वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागा यासह ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.
 
अहमदनगरच्या अकोले नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता
 
भाजप – १२ जागेवर विजयी
काँग्रेस – १ जागेवरी विजयी
राष्ट्रवादी – २ जागेवर विजयी
 
गोंदियाः जिल्हा परिषद निवडणूक निकालाचा पहिला कल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने, नेहा तुरकर १२०० मतांनी आघाडीवरभंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे विजयी खाते; देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता,
बुलडाणाः मोताळा नगरपंचायतीत १२ जागांवर काँग्रेस विजयी, सेना ४ , राष्ट्रवादी १ जागेवर विजयी
यवतमाळः राळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये मध्ये काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी
 
तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं वर्चस्व; काँग्रेसचा १२ जागांवर विजय
 
हिंगाणा नगरपंचायतीत ३ जागांवर भाजप विजयी
 
सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये आघाडीची सत्ता, राणेंना धक्का
 
सिंधुदुर्गच्या कुडाळची सत्ता आघाडीने नारायण राणेंकडून हिसकावली आहे.
 
शिवसेना – ७ जागेवर विजय
काँग्रेस – २ जागेवर विजय
भाजप – ८ जागेवर विजय
 
रायगडच्या पोलादपूरवर शिवसेनेचा झेंडा
 
शिवसेना – १० जागांवर विजयी
राष्ट्रवादी आणि काँग्रेस – ६ जागांवर विजयी
भाजप – १ जागेवर विजयी
 
औरंगाबादच्या सोयगावमध्ये रावसाहेब दानवेंना धक्का. ११ पैकी ८ जागांवर शिवसेना विजयी
 
राज्यमंत्री विश्वजीत कदमांच्या कडेगाव नगरपंचायतीत भाजपचे कमळ फुलले आहे.
 
भाजप – १० जागेवर विजय
काँग्रेस – ६ जागेवर विजय
 
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रभाग 16 अ चा निकाल,
 
महेंद्र चंडाले- 535
अमोल गवळी- 3434
सुरेश सावंत -587
तौफिक शिकलगार- 7429
उमरफारूक ककमरी :21
समीर सय्यद – 18
 
काँग्रेसचे तौफिक शिकलगार 3995 मतांनी विजयी
 
नाशिक : नगरपंचायत निवडणूक
सुरगाणा – 17 जागा निकाल जाहिर
शिवसेना – ६ जागेवर विजय
भाजप – ०८ जागेवर विजय
माकप – ०२ जागेवर विजय
राष्ट्रवादी – ०१ जागेवर विजय
 
नगरपंचायतीचे नाव – निफाड
एकुण जागा – 17
शिवसेना- 07 जागेवर विजय
काँग्रेस-01 जागेवर विजय
राष्ट्रवादी-01 जागेवर विजय
शहर विकास आघाडी – 01 जागेवर विजय
बसपा- 01 जागेवर विजय
इतर(अपक्ष)-01 जागेवर विजय
 
देवगड – भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा शिरकाव सहा जागा पटकावल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर भाजपला पाच जागा मिळवल्या आहेत. संदेश पारकर यांनी एक हाती बालेकिल्ल्याच्या नेतृत्व करत आमदार नितेश राणे यांना धक्का दिला.
 
अमरावतीच्या तिवसा नगरपंचायतीत काँग्रेस विजयी झाली आहे.
 
काँग्रेस – १२ जागा विजयी
शिवसेना – ४ जागा विजयी
वंचित – १ जाग विजयी
 
संग्रामपूर नगरपंचायत बच्चू कडू यांच्या प्रहारची एकहाती सत्ता मिळवली आहे. बच्चू कडूंनी भाजपच्या संजय कुटेंची धोबीपछाड केली आहे. प्रहार जनशक्तीचा १२ जागांवर विजय मिळाला आहे.
 
साताऱ्याच्या पाटण नगरपंचायतीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना धक्का
पाटण नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात
 
अकोला नगरपंचायत
भाजप – ८ जागा विजयी
शिवसेना – २ जागा विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस – २ जागा विजयी
 
कवठे महांकाळ नगरपंचायतीत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा विजय. रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.
 
राष्ट्रवादी – १० जागेवर विजयी
शेतकरी विकास – ६ जागेवर विजयी
अपक्ष – १ जागेवर विजयी
 
परभणीतील पालम नगरपंचायतीमध्ये
 
राष्ट्रवादी – ५ जागेवर विजयी,
रासप – ३ जागेवर विजयी
अपक्ष – १ जागेवर विजयी
 
उस्मानाबाद वाशीम नगरपंचायत
 
भाजप – ३ जागेवर विजयी
शिवसेना – ४ जागेवर विजयी
 
देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
 
राष्ट्रवादी – १३ जागेवर विजयी
भाजप – १ जागेवर विजयी
अपक्षा – २ जागेवर विजयी
 
रायगड खालापूरमध्ये शिवसेनेला ५, शेकाप २, राष्ट्रवादीला १ जागेवर विजय
रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादीला ४, शेकाप १ आणि इतरांना १ जागा मिळाली आहे.
नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना १३ जागांवर, काँग्रेस ३ जागांवर आणि भाजप एका जागेवर विजयी झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मुंबईतील सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घ्या

धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार!CSK सीईओ विश्वनाथयांचा खुलासा

हिंदूंना नाही तर भाजपला धोका आहे, असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?

उद्धव ठाकरेंच्या 2 दिवसांत दोनदा तपासण्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं, निवडणूक आयोग म्हणाला- शहा आणि नड्डा यांचीही चौकशी झाली

24 तासांत दुसऱ्यांदा तपास, शिवसेना यूबीटी नेते उद्धव ठाकरे संतापले

पुढील लेख
Show comments