Marathi Biodata Maker

अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय पुन्हा ६५

Webdunia
मंगळवार, 20 मार्च 2018 (10:55 IST)

अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय ६० वर्षांवरून पुन्हा ६५ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे मुलांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना ‘मेस्मा’ कायद्याखाली आणल्याचे सांगत ‘मेस्मा’बाबतच्या निर्णयाचे पंकजा यांनी समर्थन केले. पुढील दोन वर्षांत राज्यातील चार हजार अंगणवाडय़ांसाठी इमारत बांधण्यात येईल, असेही पंकजा यांनी जाहीर केले.

ग्रामविकास आणि महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांबाबतच्या चर्चेला पंकजा मुंडे उत्तर देत होत्या. अंगणवाडी सेविकांचे मानधन १५०० रुपयांनी वाढवल्याची माहिती मुंडे यांनी दिली. मानधन वेळेत मिळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्या म्हणाल्या. अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीवय ६० वरून ६५ वर करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

कल्याण-अंबिवली परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपचा भीषण अंत! डोक्यात थेट टीव्हीने प्रहार, तरुणीचा वेदनादायक मृत्यू

तुमच्यात हिम्मत असेल तर 'व्हर्च्युअल बकरा' कापून दाखवा; बकरीद आणि मदरशांवर नितेश राणे यांचे सर्वात वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ६६ पद्म पुरस्कार प्रदान करणार

LIVE: सीएसएमटी येथे १० दिवसांचा मेगा ब्लॉक

सीएसएमटी येथे १० दिवसांचा मेगा ब्लॉक, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या दादर आणि ठाण्यापुरत्या मर्यादित

पुढील लेख
Show comments