rashifal-2026

आई वडीलांची 12 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या

Webdunia
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (16:13 IST)
एका दाम्पत्याने आपल्या 12 वर्षांच्या मुलीसह वैनगंगा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. नागपूर जिल्ह्यातील आंभोरा येथे मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपूर्वी तिघांनी एकमेकांच्या हाताला ओढणीने बांधून घेतले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
 
श्याम गजानन नारनवरे (वय 46) सविता श्याम नारनवरे (वय 35) आणि कु. समिता समीक्षा श्याम नारनवरे (वय 12) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी होते. श्याम नारनवरे हे संत जगनाडे महाराज कोऑपरेटीव्ह सोसायटीत रोखपाल असल्याचे समोर आले आहे.
 
वेलतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैनगंगा नदी पात्राजवळ दुचाकी उभी असल्याने काही तरी दुर्घटना घडल्याचे गावक-यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. तिघांचे मृतदेह जेव्हा बाहेर काढण्यात आले होते, तेव्हा सर्वांना एकच धक्का बसला. तिघांचे हात एकमेकांना ओढणीने बांधले होते. त्यामुळे ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. श्याम नारनवरे हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते असे समजते. या प्रकरणी वेलतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर एकदिवसीय संघातून बाहेर, आयुष बदोनीची निवड

राज ठाकरेंच्या धमकीला अण्णामलाईंनी दिले सडेतोड उत्तर: "मी मुंबईत येत आहे, माझे पाय कापून दाखवा..."

LIVE: लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप

नागपुरात लाखो रुपये रोख, शस्त्रे आणि ड्रग्ज जप्त

लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप, आगाऊ रक्कम देणे थांबवले

पुढील लेख
Show comments