Dharma Sangrah

प्रवाशांनी एसटी बसमध्येच छत्री उघडून केला प्रवास

Webdunia
रविवार, 25 जून 2023 (16:28 IST)
social media
राज्यात अखेर मान्सूनने हजेरी लावली आहे. मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे रस्त्यात पाणी साचले असून रस्ते तुडुंब भरले आहे. पहिल्या पावसामुळे पाणी साचल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पावसामुळे एसटी बसमध्ये गळती होऊन बसमधील प्रवाशांनी छत्री उघडून प्रवास करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मध्ये एसटी बसला गळती होऊन बसमधील प्रवासी चक्क छत्री खोलून प्रवास करत आहे. 

सदर व्हिडीओ पालघरच्या सफाळे आगारातील एसटीबसचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न केले जात असून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  
राज्यात सध्या मान्सूनचे आगमन झाले असून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक खोळंबली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे वर पावसाचा परिणाम झाला असून लोकल 15 ते 20 मिनिट विलंबाने  धावत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

GDB संशोधन: भारतातील ३०% पेक्षा जास्त महिलांना बालपणातील लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागला

दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

बिबट्याचा धुमाकूळ, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

दिवाळी सण युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत सामील

पुढील लेख
Show comments