Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पवारांचे राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय होत नाही - गोपीचंद पडळकर

gopichand padalkar
Webdunia
गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (07:56 IST)
जातीवाद पसरवणे, भ्रष्टाचार करणे, अनेक भागांना पाण्यापासून वंचित ठेवणे, मुलभूत सुविधा न देणे. राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री काय केले? देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य सांगितले आणि पवारांचा चेहरा डांबरासारखा काळा झालाय. त्यामुळे पवारांकडे उत्तर नाही. ते यावर बोलू शकत नाहीत. ते निरुत्तर आहेत अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
 
गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी १५ दिवसांपूर्वी पवारांच्या खेळीनं पहाटेचा शपथविधी झाला हे सांगितले होते. शरद पवारांचे राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय होत नाही हे पुन्हा सिद्ध झाले.सरकार मजबूत आहे. शिल्लक असलेली माणसं टिकवण्यासाठी काहींना सरकार कोसळणार अशी विधाने करावी लागतात असं त्यांनी सांगितले.
 
तसेच विरोधी पक्षात असताना एकही आमचा आमदार फुटत नाही. पवारांची सत्ता गेल्यानंतर लगेच आमदार पळायला लागतात. मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेचे ५० आमदार गेले. अडीच वर्षात आमचा एकही आमदार म्हटला नाही मला पक्ष सोडायचा आहे. आम्ही विचाराने काम करतोय. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबावाखाली येऊन पक्षांतर करतोय असं म्हटलं नाही. त्यामुळे सरकार पूर्ण मजबूत आहे, काही चिंता करू नका असंही पडळकरांनी म्हटलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

आता नागपुरात बुलडोझर चालणार! मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दंगलखोरांकडून नुकसान भरून घेणार

LIVE: नागपूर हिंसाचार प्रकरणात हमीद इंजिनिअरला अटक

जळगावमध्ये शिवसेना नेत्याची चाकूने वार करून हत्या, एकाला अटक

सात मजली इमारतीला भीषण आग, एका व्यक्तीचा मृत्यू

पालघरमध्ये २ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्याला अटक

पुढील लेख
Show comments