Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आर्थिक घोटाळेबाज फडणीस एखेर अटक कोट्यवधींची फसवणूक

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:26 IST)

फडनिस ग्रुप ऑफ़ कंपनीज आणि फडनिस इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून पैसा दाम दुप्पट करणार असे भासवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणुक केलेल्या विनय प्रभाकर फडनिस याला पोलिसांनी विक्रोळी  मुंबई  येथून अटक केली आहे. तर मुंबई नाका पोलिस स्टेशन येथे सुधिर नागेश हिंगे (६५) खोडेनगर यांनी फिर्याद दिली असून त्यांची एकूण १० कोटी ४३ लाख ७२ हजार रुपयांची फडणीस ग्रुप  फसवणूक केली असून मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

फडणीस ग्रुपचे महाराष्ट्रातच 8000 च्या आसपास गुंतवणूकदार असून नाशिकमध्येच 2000 गुंतवणूकदार आहेत. एकूण तब्बल 300 कोटींचा  किंवा अधिक रुपयांचा हा घोटाळा उघड झाला आहे.झटपट श्रीमंती साठी अनेकांनी लाखो कोट्यावधी रुपये गुंतवले होते. तर या प्रकरणात जवळपास २०० तक्रारी पोलिसांकडे प्राप्त आहेत.

या प्रकरणात ३०/०९/२०१६ रोजी फडनिस ग्रुप ऑफ़ कंपनीज आणि फडनिस इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात अनेक  गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी फिर्याद दिली  होती  त्या अंतर्गत गुरनं २६३/२०१६  ब भादविक ४२०,४०९,४०६, १२० ब  सह  महाराष्ट्र गुंतवणुकदारांचे  हितसंरक्षण    कायदा१९९९  कलम ३ व ४ नुसार गुन्हा  दाखल आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे  शाखा करणार आहे. मुख्य संशयित ताब्यात आल्याने पोलिसांना तपास योग्य पद्धतीने आणि वेगात करता येणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments