Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पान मसाला खाणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतील- नितीन गडकरी

Webdunia
गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (11:29 IST)
नागपूर : पान मसाला खाताना आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांची छायाचित्रे क्लिक करून वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावीत, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, पूर्वी मी माझ्या गाडीतून चॉकलेटचे रॅपर फेकत असे. आज मी जेव्हा चॉकलेट खातो तेव्हा त्याचे रॅपर घरी घेऊन डस्टबिनमध्ये टाकतो.
 
तसेच केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, लोक खूप हुशार आहे. चॉकलेट खाल्ल्यानंतर ते लगेच त्याचे रॅपर फेकून देतात. पण, परदेशात गेल्यावर चॉकलेट खाल्ल्यानंतर ते चॉकलेटचे कव्हर खिशात ठेवतात. परदेशात त्याची वागणूक चांगली आहे.
 
तसेच आता सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत गडकरी म्हणाले की, लोक पान मसाला खातात आणि रस्त्यावर थुंकतात, याचे फोटो काढून ते वृत्तपत्रात प्रसिद्ध केले पाहिजेत. महात्मा गांधींनी असे प्रयोग केले होते, असा ही दावा त्यांनी केला.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments