केंद्रीय मंत्री मंडळात सुप्रिया सुळे मंत्री होणार
शरद पवार म्हटले की राजकीय गणित असतेच. आसाचा काहीसा प्रकार पुन्हा समोर आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक दावा केला आहे. त्यांनी असे सांगितले आहे की पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. सामना वृत्त पत्रात दिलेल्या वृतात राऊत असे म्हणत आहेत.
पवार काय म्हणतात?
महाराष्ट्राचे बलदंड नेते श्री. शरद पवार यांच्याशी भेट झाली. देशाच्या राजकारणावर चर्चा झाली. ‘‘आपण भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागला आहात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शरद पवारांना स्थान असल्याच्या बातम्या जोरात होत्या, हे कसे?’’ यावर श्री. पवार म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे? त्या बातम्या म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.’’
‘‘मग तुमच्या किंवा राष्ट्रवादी काँगेसच्या बाबतीत बातम्या का येतात?’’
‘‘या अफवा ठरवून पसरवल्या जातात. एकदा श्री. मोदी मला म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळात मला सुप्रिया हवी आहे. सुप्रिया तेव्हा माझ्याबरोबरच होती. तिने मोदी यांना तोंडावर सांगितले, भारतीय जनता पक्षात जाणारी मी शेवटची व्यक्ती असेन. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत, पण गोंधळ उडविण्यासाठी अशा बातम्या पसरविल्या जातात.’’
शरद पवार यांचे हे म्हणणे, पण आजही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे पुढारी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीने फडणवीस मंत्रिमंडळात सामील व्हावे असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल व त्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर गुप्त बैठका सुरू असतील तर त्यामुळे शिवसेनेस विचलित होण्याचे कारण नाही. आज फक्त ४१ आमदारांची ताकद असलेल्या राष्ट्रवादीसाठी उंटाच्या पाठीवरील ती शेवटची काडी ठरेल व भाजपचीही त्यामुळे एकदाची पोलखोल होईल.
पुढील लेख