Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इन्स्टाग्रामवर दादागिरीचे रिल्स बनवणं पडलं महागात

इन्स्टाग्रामवर दादागिरीचे रिल्स बनवणं पडलं महागात
, बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (10:21 IST)
उल्हासनगर : थेरगाव क्वीन प्रकरण ताजं असतानाच आता उल्हासनगरात इंस्टाग्राम वर दादागिरीचे व्हिडीओ बनवून टाकणं काही तरुणांना महागात पडलं आहे. कारण अशा व्हिडीओमुळे समाजात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
उल्हासनगरात सोमवारी इंस्टाग्रामवरील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्यात काही तरुण दादागिरीची भाषा वापरत शिवीगाळ करत होते. एवढंच नव्हे तर काही व्हिडिओमध्ये तरुणांच्या हातात बंदुकासुद्धा दिसत होत्या. यामध्ये 307, 302 असेही शब्दप्रयोग वापरण्यात आले होते. 
 
हे कलम हत्येचा प्रयत्न आणि हत्या यांचे असल्याने संबंधित तरुण समाजात दहशत माजवून दादागिरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. विठ्ठलवाडी पोलिसांनी या सर्वांचा शोध घेत कृष्णा कुंभार, विशाल कुंभार, अभय गायकवाड, रोशन मलिक आणि एक अल्पवयीन मुलगा अशा एकूण पाच जणांना अटक केली. 
 
यापैकी चौघांची न्यायालयीन कोठडीत, तर एकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समजते. यापैकी एकावर तडीपारीची कारवाई सुद्धा प्रस्तावित आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्नावमध्ये साक्षी महाराजांनी केले मतदान