Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Police Sub Inspector Murder सांगोल्यात PSI ची भररस्त्यात हत्या

Webdunia
गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (12:54 IST)
Police Sub Inspector Murder सांगोल्यात पोलीस उपनिरीक्षकाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून धारदार शस्त्राने वार करून PSI चा खून केला. 
 
जेवण झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे हे शतपावलीसाठी गेले असता घरी परतलेच नाहीत. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
 
पीएसआय सुरज चंदनशिवे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वासूद येथील केदारवाडी येथील रहिवासी होते. बुधवारी रात्री जेवणानंतर ते केदारवाडी रोडवरशतपावली करण्यासाठी गेले असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून त्यांच्या डोक्यात वार करुन त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळून आला.
 
PSI सुरज यांची पोलीस दलातील कारकीर्द वादग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. 2018 मध्ये वारणानगर येथील 9 कोटी रुपये चोरीच्या प्रकरणात सुरज चंदनशिवेंचे नाव समोर आले असताना त्यांना या प्रकरणात पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. एका वर्षापूर्वी हे निलंबन रद्द करून सांगली मुख्यलायत ते रुजू झाले होते. सांगली मुख्यालयात कार्यरत असताना पुन्हा एकदा दोन महिन्यांपूर्वी त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.  
 
पीएसआय सूरज चव्हाण यांचा मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे. आणि पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा पोलीस तपास सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला

LIVE: शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

मुंबईसह अनेक शहरांमध्ये चार दिवस ड्राय डे जाहीर

एनसीपी नेता छगन भुजबल यांचा बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध

पुढील लेख
Show comments