लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून उद्या 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यंदा भाजपला बहुमत जरी मिळाले नाही तरी एनडीएच्या घटक पक्षांच्या साथीने सरकार स्थापिले जाणार आहे. यंदा महाराष्ट्र राज्यात देखील महायुतीत अजितपवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि शिवसेना शिंदे गटाचा सहभाग केला.
काल एनडीएचे संसदीय बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील संहभागी झाले. या दोन्ही गटाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार की नाही या कडे सर्वांचे लक्ष वेधले होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या गटातील नेते प्रफुल पटेल मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या राष्ट्रपती भवन येथे सायंकाळी 7 वाजता शपथविधी समारोह पार पडणार असून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर शपथ घेणार आहे.