Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रताप सरनाईकांची 11.35 कोटी रूपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

Webdunia
शुक्रवार, 25 मार्च 2022 (13:58 IST)
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सातत्याने होत आहे. आधी अनिल देशमुख मग नवाब मलिक आणि आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक.
 
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्यांच्याशी संबंधित ईडीने 2 फ्लॅट आणि एक जमीन जप्त केली आहे. या जप्त केलेल्या प्रॅापर्टीची किंमत 11.35 कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
कथित एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत 3254 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं ईडीनं म्हटलंय.
 
NSCL प्रकरणातील आस्था ग्रुपने 21.74 कोटी रूपये विहंग आस्था हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर केले होते. यातील 11.35 कोटी रूपये विंहग एंटरप्रायझेस आणि विहंग इम्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले होते असं ईडीचं म्हणणं आहे. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक यांच्या नियंत्रणात आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी ते उद्धव ठाकरेंकडे सातत्याने करत होते. अशा स्थितीत आगामी काळात महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, त्याआधीच शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

LIVE: नितेश राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन मुलींचा मृत्यू

बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली, पाणी मागितले तर तो ग्लासमध्ये थुंकला; विद्यार्थ्याचे भयानक क्रूर रॅगिंग

हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले, विजय वडेट्टीवार म्हणाले आम्हाला आनंद....प्रतिक्रिया आली समोर

पुढील लेख
Show comments